"तुमचा ग्राहक रागावलेल्या परिस्थिती मध्ये असतानाचे २ अती प्रभावशाली नियम..!"
ग्राहकाच्या रागावलेल्या उत्तरामुळे तुमच्या जिभेचा ताबा व डोक्याचा पारा सुटतो का ?
जर हा प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल तर तुम्ही योग्य लेख वाचत आहात आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा कारण हा लेख नसून सुवर्णपत्र आहे.
नमस्कार मी अंकिता विजय पेंडूरकर तुमची सेल कन्सल्टंट Versatile Sellmatic Hub ची फाउंडर .... मी वयाच्या सतराव्या वर्षी विक्री क्षेत्रात काम सुरू केलं आणि आज माझा आठ वर्षाचा अनुभव हे सांगत आहे की...
विक्रता नेहमी ग्राहकाला आपला उत्साह स्थानांतरित करतो.
लेख सुरू करण्याआधी तुम्हाला खाली दिलेले हे प्रश्न पडतात का ते पहा...
ग्राहक चुकीचे उत्तर म्हणजेच रागात तुमच्याशी का बोलतात ?
ग्राहकाच्या चुकीच्या उत्तरांमुळे तुमचा पारा वाढतो का ?
तुमचा पारा वाढल्यामुळे तुमचा हातून ती विक्री निघून जाते का ?
तुम्ही लगेचच नकारात्मक मानसिकतेकडे वळता का?
आता ह्या पुढील माझा सगळ्या विक्री अशाच होणार आहेत हा विचार तुमच्या मनात येतो का ?
तुम्ही पुढील विक्री करण्यासाठी जाताना मागील विक्रीचा विचार करत राहता का ? (हा ग्राहक माझ्याशी एवढ्या रागात का बोलला)
आता ग्राहक असे का बरं उत्तरे देत असतील व रागात का बोलत असतील....
चला तर मग प्रथम जाणून घेऊयात ह्याची कारणं
1. तुम्ही जाण्याआधी ग्राहकांचे त्यांच्या व्यवसाय व कामा संबंधित चढ उतार व वाद झाले असतील...
2.कदाचित बॉस सोबत कामावरून विसंवाद झाला असेल..
3. कौटुंबिक वादावादी व टेन्शन असते...
4. कोरोनाच्या काळात खर्चाने त्रस्त झाले असतील व भविष्याचा विचार भेडसावत असेल..
5.जॉब ला व ऑफिसला येताना ट्रेन, टॅक्सीमध्ये वाद झाले असतील...
इत्यादी
म्हणजेच मित्रांनो आपण आपल्या ग्राहकाचा आपण जाण्याआधी चा मूड ठरवू किंवा जाणू शकत नाही.
हे मात्र नक्की की असे वरील प्रश्न नेहमीच होतात असे नाही कदाचित ग्राहकांचा मूड खूप आनंदी असेल ही मात्र आपल्या लेखाचा विषय हा आहे की ग्राहकांचा मूड शांत नसल्यास काय करावे आहे.... आणि आपली विक्री कशी वाढवावी..
चला तर मग जाणून घेऊयात अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जिभेचा ताबा, डोक्याचा पारा कसा सांभाळावा...
सेलिंग 101 झिग झिगलर यांच्या पुस्तकांमध्ये दोन नियम दिलेले आहेत ते आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत आणि आत्मसात करून , आपली विक्री वाढवायची आहे.
आता दोन्ही नियमांचं विश्लेषण जाणून घेऊया..
1. जिभेवर साखर म्हणजेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये, ग्राहकांची काही ही उत्तरे आल्यावर उलट उत्तर न देता जिभे वर साखर असल्या प्रमाणे सौम्य आवाजात उत्तरं द्यायची आहेत.
2. डोक्यावर बर्फ म्हणजेच बर्फासारख थंड शांत डोक्याने उत्तर द्यायचा आहे किंवा ऐकून घ्यायचे आहे.
आपल्याला रागवलेल्या चिडलेल्या अवस्थेत असलेल्या आपल्या संभाव्य ग्राहकाला पूर्णपणे शांत डोक्याने ऐकून घ्यायचे आहे.
तुम्हाला हा प्रश्न आला असेल आपण काय त्यांचा राग ऐकायला जाणार आहोत का?
तर हो
कारण हा अनुभव आपल्याला सुद्धा आला असेल की आपण रागात आपल्या मनात असलेलं सगळं काही व्यक्त करतो. तसंच आपला ग्राहक ही रागात सगळं काही व्यक्त करणार आहे आणि ह्याच मुळे आपल्याला आपल्या ग्राहकाचा वीक पॉईंट कळणार आहे ,ज्या वर आपण भर देऊन जगविख्यात असलेला विक्री चा फॉर्मुला *स्पिन सेलिंग*( SPIN SELLING) वापरून आपली विक्री करणार आहोत.
म्हणूनच झिग झिगलर म्हणतात विक्री करत असताना नेहमी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असणं फार महत्त्वाचं कारण तुमचे शब्दच हे ७० टक्के तुमच विक्रीच काम करत असतात.
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की स्पिन सेलिंग (SPIN SELLING) म्हणजे नक्की काय?
स्पिन सेलिंग सोबतच विक्री क्षेत्राची अजून माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या Versatile Sellmatic Hub लिंक वर क्लिक करा आणि फेसबुक कम्युनिटीला जॉईन व्हा आणि अशाच बऱ्याच सेलिंग चा व्हिडिओ पाहण्यासाठी Versatile Educaare System ह्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
धन्यवाद...!
Comments
Post a Comment